Shelar Mama

Shelar Mama
शेलार मामा 

 ज्या शेलारमामांबद्दल आपण ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ ऐकत आलो आहोत आणि ज्यांना आपण त्यांच्या समार्थ्या बद्दल आणि शौर्या बद्दल ओळखतो त्यांचा खरं आणि पूर्ण नाव ' कोंडाजी रायाजी शेलार ' असं आहे. कोंडाजींच्या वडिलांचं नाव ' रायाजी कानोजी शेलार ' आणि आईचं नाव ' जनिबाई रायाजी शेलार ' असं होतं. 

रायाजींना दोन अपत्य. एक पुत्र म्हणजे कोंडाजी आणि कन्या म्हणजे पार्वती. या दोघांचा जन्म सध्याच्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कुडपण या गावी झाला .या गावाला खुप सुंदर असं नैसर्गिक वरदान लाभल आहे. तीन जिल्ह्यांच्या अगदी मधोमध हे गाव वसले आहे. घनदाट जंगल , गर्द वनराई , सह्याद्रीच्या  आभाळाला टेकणाऱ्या डोंगर रांगा आणि याच डोंगरां मधून येणारी जगबुडी नदी अश्या नैसर्गिक श्रीमंती असलेल्या ठिकाणी वसलेले कुडपण हे शेलार मामांचे गाव. बघता क्षणी डोळ्यांचे पारणे फिटेल इतके सुंदर आहे. 

शेलार मामांची बहिण पार्वतीबाई यांचा विवाह गोडवली गावचे पाटील ' काळोजी मालुसरे ' यांच्याशी लावण्यात आला. काही काळानंतर कोंडाजींचा देखील विवाह जावळी खोऱ्यातील लक्ष्मीबाईं सोबत लावण्यात आला. दरम्यानच्या काळात सबंध भारतवर्षात मुघलांनी हैदोस घातला होता आणि त्यांचे अत्याचार खुप वाढले होते. या अत्याचारांची कल्पना कोंडाजी यांना कुडपण पर्यंत आली होती. त्यांच्या मनी बऱ्याच दिवसा पासून आपल्या बहिणीची आणि भाचांची भेट घेण्याचे विचार येत होते . त्यांच्या मनाची घालमेल होत होती .लगोलग कोंडाजी अमावस्येच्या रात्रीच कोणताही विचार न करता निघाले आणि दुसऱ्याच दिवशी तिथे पोहोचल्यास त्यांच्या नजरेस भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पडले. घर जळत होती, कितीत मृतदेह पडले होते, लोक घर सोडून पळ काढत होती, सर्विकडे हाहाकार माजला होता. हे सगळे पाहताच ते बहिणीच्या सासरी (पाटीलवाडा) येथे पोहोचले आणि आपल्या बहिणीची अवस्था बघून कोंडाजी हादरून गेले. पार्वतीबाई त्यांचे पती काळोजी यांच्या मृतदेहापाशी बसून ओक्साबोक्शी रडत होत्या आणि सूर्याजी तान्हाजी सुद्धा वडिलांच्या पायाशी बसून शोक करत होते. कोंडाजींनी आपल्या बहिणीची विचारपूस केली असता त्यांना समजले की मुघलांचे प्रस्थ इतके वाढले होते की त्यांनी जुलूम आणि अत्याचारांचा सपाटा लावला होता.  काळोजी सुद्धा याच अत्याचाराला प्रखर विरोध करताना बळी पडले . आपली बहीण विधवा झाली या दुःखाने शेलारमामा यांनी एक निर्णय घेतला आणि क्षणाचाही विलंब न करता बहिण पार्वतीबाई आणि भाचे तान्हाजी सूर्याजी यांना काळोजी यांच्या नंतर घातपाताची दाट शक्यता आहे या शंकेने त्यांना तडख तिथून घेऊन निघाले आणि स्वतःच्या गावी कुडपण ला घेऊन आले.

प्रतापगडच्या मावळतीकडे सह्याद्रीच्या डोंगर रंगांच्या कुशीत वसलेले सुंदर असे कुडपण गाव. या गावात शेलारमामा यांच्या सोबत तान्हाजी सुर्याजी यांचं बालपण जाऊ लागलं. तलवारबाजी, लाठी काठी, दांडपट्टा चालवणे , विटा (शस्त्र) , ढाल संरक्षण या सगळ्याच सराव करू लागले. सोबतच इतर काम सुद्धा शिकू लागले. कुडपण मध्ये राहत असताना तान्हाजी सूर्याजी गावात ३ नदीच्या काठावर असलेले भराडी मातेच्या पौराणिक आणि जागृत अश्या मंदिरा मध्ये नवरात्री आणि देवीचा उत्सव जल्लोषात साजरी करायचे. शेलार मामांचे पुत्र साबाजी हे तान्हाजी सूर्याजींचे थोरले मामे भाऊ सुद्धा आपल्या लहान भावांना लाडाने जंगलातून आपल्या खांद्यावर बसवून फिरवून आणत आणि त्यांना त्यांच्या आवडीची फळ,कंदमूळ वैगरे खायला देत. साबाजी शेलारमामांची पुढील पिढी असल्याने गावाकडे पण वडिलां प्रमाणेच सगळ्या बाजूने लक्ष ठेवत.


मित्रांनो पुढील ऐतीहासिक माहिती लवकरच शेअर करतो 

धन्यवाद 

संपर्क - insta id- ajay shelar

Comments

Popular posts from this blog

सनातन हिन्दू धर्म क्या है

Maharana Pratap

chandra shekhar azad