Posts

Showing posts from March, 2024

छत्रपती संभाजी महाराज

🙏बलिदान मास 🙏 संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तिशिवाय पुर्णच होवु शकत नाही आणि ती व्यक्ति म्हणजे कवी कलश. कवी कलश यांची बुद्धीमत्ता निष्ठा व शौर्य पाहुनच संभाजी राजांनी कवी कलशांना अष्टप्रधान मंडळात सामिल करुन घेतले व त्यांना "छंदोगामत्य" अशी पदवी दिली.  कवी कलश एवढे बुद्धीमान होते की संभाजी राजे बहुतेक निर्णय त्यांच्या सल्लामसलती नंतरच घ्यायचे परंतु त्यांचा एखादा निर्णय किंवा मोहीम बाहेर फुटली असे कधीच घडले नाही यावरुन कवी कलशांची विश्वसनीयता स्पष्ट होते आणि म्हणुनच संभाजी राजांनी त्यांना पुढे "कुलमुख्तेयार" म्हणजे प्रशासनाचे प्रमुख म्हणुनही जबाबदारी दिली होती. संभाजी राजांनी औरंगजेबाशी होणार्‍या अखेरच्या लढाईची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे जी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कवी कलशही जातीने हजर झाले होते. संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही कैद झाले होते. औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ करु पाहीला.  त्यांना वेगळे भेटायला बोलवुन जहांगिरीचे आमिष दाखविले. परंतु कवी कलश बादशहाच्या आमिषाला न धजता स्वराज्याच्या खाल्या मिठाला जागले. कवी कलशांनी महाराष्ट्राशी व स्वराज्य

मुरुड जंजिरा

Image
 🚩 जंजिरा किल्ला 🚩 राजधानी रायगड मध्ये मुरुड-जंजिरा ठिकाणी 02/03/2024 अनुभवलेला एक दुर्दैवी क्षण आपण कोणतेही वाईट क्षण अनुभवले तर ते दुर्लक्षित करतो आणि आपण मनातच पुटपुटतो आपले काही वयक्तिक नुकसान झाले नाही ना मग आपल्याला काय करायचं आहे आणि आपण घटनेकडे कानाडोळा करतो. पण आज मी ठरवले आहे घडलेला क्षणाने जरी माझे नुकसान झाले नसले तरी ते आपल्या बांधवांपर्यंत पोहचवायला हवे जेणेकरून आवाज उठवला जाईल आणि सर्व पर्यटक सावध होतील. एकदा तिकडे गेलेला पर्यटक तिथे पुन्हा जाणार नाही असा वयक्तिक अनुभव आम्हाला आला आहे. मी जंजिरा किल्ला,पद्मदुर्ग किल्ला ला या आधीही 6 वर्षांपूर्वी गेलो होतो पण असा वाईट क्षण अनुभवायला मिळाला नव्हता पण या वेळेस खूपच चुकीचे प्रकार तिथे दिसले. माझे कुटुंब आणि माझ्या मित्राचे कुटुंब अलिबाग-नागाव मधून सकाळी 11 वाजता अभयारण्य मार्गे जंजिरा किल्ला पद्मदुर्ग किल्लाकडे निघालो रस्त्यामध्ये नगरपरिषद कर, ग्रामपंचायत कर भरून जंजिरा जवळ पोहचलो. आम्ही तिथे पोहचल्यावर लगेच तिकीट काढले (प्रत्येकी 100 रुपये) आणि आम्ही सर्व रेवती नौका मध्ये जाऊन बसलो त्या नौका मध्ये कोणत्याही प्रकारच्या