छत्रपती संभाजी महाराज

🙏बलिदान मास 🙏

संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तिशिवाय पुर्णच होवु शकत नाही आणि ती व्यक्ति म्हणजे कवी कलश.

कवी कलश यांची बुद्धीमत्ता निष्ठा व शौर्य पाहुनच संभाजी राजांनी कवी कलशांना अष्टप्रधान मंडळात सामिल करुन घेतले व त्यांना "छंदोगामत्य" अशी पदवी दिली. 

कवी कलश एवढे बुद्धीमान होते की संभाजी राजे बहुतेक निर्णय त्यांच्या सल्लामसलती नंतरच घ्यायचे परंतु त्यांचा एखादा निर्णय किंवा मोहीम बाहेर फुटली असे कधीच घडले नाही यावरुन कवी कलशांची विश्वसनीयता स्पष्ट होते आणि म्हणुनच संभाजी राजांनी त्यांना पुढे "कुलमुख्तेयार" म्हणजे प्रशासनाचे प्रमुख म्हणुनही जबाबदारी दिली होती.

संभाजी राजांनी औरंगजेबाशी होणार्‍या अखेरच्या लढाईची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे जी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कवी कलशही जातीने हजर झाले होते. संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही कैद झाले होते. औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ करु पाहीला. 

त्यांना वेगळे भेटायला बोलवुन जहांगिरीचे आमिष दाखविले. परंतु कवी कलश बादशहाच्या आमिषाला न धजता स्वराज्याच्या खाल्या मिठाला जागले. कवी कलशांनी महाराष्ट्राशी व स्वराज्याशी व संभाजी राजांशी ईमान राखत आपल्या देहाचे बलिदान याच महाराष्ट्राच्या भुमीवर संभाजी राजांच्या अगोदर दिले. संभाजी राजांबरोबर एवढ्या हाल अपेष्टा भोगणारा प्रत्यक्ष मृत्युलाही सामोरे जाणार्‍या कवी कलशांचा हा महाराष्ट्र नेहमीच ऋणी राहील. 

__/\__


ll जय रौद्र शंभुराजे ll 🚩

Comments

Popular posts from this blog

सनातन हिन्दू धर्म क्या है

Maharana Pratap

chandra shekhar azad