मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा
 🚩जंजिरा किल्ला🚩

राजधानी रायगड मध्ये मुरुड-जंजिरा ठिकाणी 02/03/2024 अनुभवलेला एक दुर्दैवी क्षण

आपण कोणतेही वाईट क्षण अनुभवले तर ते दुर्लक्षित करतो आणि आपण मनातच पुटपुटतो आपले काही वयक्तिक नुकसान झाले नाही ना मग आपल्याला काय करायचं आहे आणि आपण घटनेकडे कानाडोळा करतो. पण आज मी ठरवले आहे घडलेला क्षणाने जरी माझे नुकसान झाले नसले तरी ते आपल्या बांधवांपर्यंत पोहचवायला हवे जेणेकरून आवाज उठवला जाईल आणि सर्व पर्यटक सावध होतील. एकदा तिकडे गेलेला पर्यटक तिथे पुन्हा जाणार नाही असा वयक्तिक अनुभव आम्हाला आला आहे.

मी जंजिरा किल्ला,पद्मदुर्ग किल्ला ला या आधीही 6 वर्षांपूर्वी गेलो होतो पण असा वाईट क्षण अनुभवायला मिळाला नव्हता पण या वेळेस खूपच चुकीचे प्रकार तिथे दिसले.

माझे कुटुंब आणि माझ्या मित्राचे कुटुंब अलिबाग-नागाव मधून सकाळी 11 वाजता अभयारण्य मार्गे जंजिरा किल्ला पद्मदुर्ग किल्लाकडे निघालो रस्त्यामध्ये नगरपरिषद कर, ग्रामपंचायत कर भरून जंजिरा जवळ पोहचलो. आम्ही तिथे पोहचल्यावर लगेच तिकीट काढले (प्रत्येकी 100 रुपये) आणि आम्ही सर्व रेवती नौका मध्ये जाऊन बसलो त्या नौका मध्ये कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी दिसली नाही किंवा सुरक्षेची माहितीही नाही जे सुरक्षा जॅकेट द्यायला हवे तेही दिले नाहीत. रेवती नौकेमध्ये एकूण चार ग्रुप बसले होते एक गुजरात वरून आलेला महिलांचा, एक तरुण मुलांचा, एक मराठी महिलांचा आणि एक आमचा ग्रुप होता. किनारा पासून दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी नौका निघाली नौकाचालक किल्ला पासून लांब अंतरावर नौका घेऊन गेलेत तिकडे एक गावाजवळून दुसरी साधी नौका या मोठ्या नौकेला बांधून सोबत घेतली ते बोलले या साध्या छोट्या नौकेतून आपल्याला जंजिरा किल्ला जवळ उतारायचे आहे. किनारा स्थानक पासून किल्ल्याजवळ पोहचण्याचा वेळ फक्त 15 मिनिट आहे परंतु आम्ही तिथून निघाल्यावर आम्ही 45 मिनिटांनी किल्ल्याजवळ पोहचलो त्यानंतर त्यांनी नौका दरवाजा जवळ थांबवली त्या आधीच बाजूला किल्ल्याच्या भिंतीजवळ (अंधाराचा भाग) थांबवली आणि तिथे माहीर नावाच्या मुलाने अचानक हिंदीमध्ये किल्ल्याची माहिती द्यायला सुरवात केली परंतु आम्ही कोणीच किल्ल्याची माहिती हवी आहे किंवा सांगा असे वक्तव्य केले नव्हते. त्याने 15 मिनिट माहिती दिली त्यामध्ये मराठा साम्राज्याचा उल्लेख मुद्दाम दुर्लक्षित केला त्यामध्ये त्याने हिंदू मराठा,हिंदू कोळी यांचा ऐतेहासिक भाग जाणूनभजून दुर्लक्षित केला, थोड्याच माहिती मध्ये त्या मुलाने त्याचा हेतू साधला आणि माहिती सांगून झाल्यावर त्याने प्रत्येक ग्रुपकडे 400-500 रुपयाप्रमाणे मागणी करायला सुरुवात केली. त्यावेळी नौका मधील सर्व पर्यटक नाराज होऊन एकमेकांसोबत बोलायला लागले की आधी नौका मुद्दाम किल्ल्याच्या भिंतीजवळ अडगळीच्या ठिकाणी आणून 15 मिनिट थांबवली आहे जिथून कोणाला कोणत्याच प्रकारचा प्रतिकार करता येणार नाही आणि वाद घालता येणार नाही आणि त्यानंतर ही त्यांची पुढील मनमानी चालूच होती त्यांनी जबरदस्ती पैसे मागायला सुरवात केली, आम्ही त्या ठिकाणी कोणताच प्रतिकार करू शकत नव्हतो कारण त्यांचा तो रोजचा तासा-तासा चा धंदा होता, आमच्या 4 ग्रुप मधून 3 ग्रुप ने पैसे दिले परंतु एक मराठी महिला ग्रुप ने शेवटपर्यंत पैसे दिलेच नाहीत.

त्यानंतर त्यांनी नौका किल्ला दरवाजा जवळ घेऊन लोकांना उतरवले पूर्ण 1 तासानंतर आम्ही किल्ला दरवाजा जवळ पोहचलो आणि त्यांनी तिथे सर्वांना सांगितले फक्त 45 मिनिट किल्ल्यामध्ये थांबता येईल त्या वरील वेळेत तुम्ही तुमची स्वतःची जबाबदारी घ्या, त्यांच्या प्रत्येक सूचनेमधुन आपण एक वेगळ्या राज्यात आल्यासारखे जाणवत होते. किल्ल्यामध्ये गेल्यावर आम्ही किल्ला प्रवेश तिकीट काढले (प्रत्येकी 25 रुपये) किल्ला देखभाल व्यवस्थापन खूपच खराब होते, किल्ल्यात फिरण्याचे 45 मिनिट सहज संपले. आम्ही निघताना माझ्या मित्राने म्हणजेच होळकरांचे वंशजानी दरवाजावर असलेल्या व्यवस्थापकांसोबत वाद घातला की तुम्ही नक्की शुल्क कसले आकारता कोणत्यांच प्रकारची साफसफाई नाही मनपूर्वक काळजी नाही, मग बंद करा सामान्य माणसांकडून तिकीट वसुली, येणाऱ्या पर्यटन संघटना साफसफाइ करतील असे त्यांना खडसावले. आम्ही दुपारी 2pm वाजता आतमध्ये प्रवेश केला होता आणि तिथून 2.35pm ला बाहेर आलो आणि रेवती नौका मध्ये चढण्यासाठी रंगेत उभे राहिलो, हळूहळू सर्वजण नौका मध्ये बसले आणि थोड्याच वेळात तिथे एक मुलगा पाण्यातून पोहत आला आणि नौकेमध्ये चढला आणि त्याने बोलायला सुरवात केली मी IT चा विधार्थी आहे आणि माझ्या फावल्या वेळेत इथे पर्यटकांना मदत करतो कोणाचा पाण्यात कॅमेरा किंवा मोबाईल पडला तर तो समुद्राच्या तळापासून काढून देतो, मला तुम्ही सर्वांनी मदत करा 100 पासून कितीही किमतीपर्यंत पैसे द्या, तो मुलगा 10 मिनिट वेळ झाला थांबला, लोक बोलले आम्ही असे सारखे सारखे पैसे नाही देऊ शकत त्यावर तो बोलला एखाद्या वेळेस एखाद्याला मदत केलीत तर काय बिघडणार आहे का, असे बरेच काही भावनिक ब्लॅकमेल करायला लागला, दुपारची उन्हाची वेळ होती सर्वजण वैतागले होते आणि आता यामध्ये अजून वेळ जाऊ नये म्हणून बऱ्याच लोकांनी 100 रुपयांनी 50 रुपयांनी पैसे दिले, आणि त्यानंतर नौका किनाऱ्याच्या दिशेनी निघाली , या 2 तासामध्ये पर्यटणाचा आनंद घेणे बाजूलाच राहिले पण मनस्ताप झाला आणि पुन्हा तिकडे जायची इच्छा मावळली, सरकारने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन तिथे पर्यटकांसाठी सुरक्षेच्या मुद्द्याकडे लक्ष तसेंच इतर चुकीच्या गोष्टी घडू नये म्हणून काळजी घ्यायला हवी. 

मुरुड जंजिरा

@maharashtragovernment

@nationgovernment

@ArcheologyDepartment

@Maharashtratourismdepartment

@CMOMaharashtra


पर्यटन अनुभव लेख,

अजय राजाराम शेलार

insta id:- insta id- ajay shelar

Comments

  1. पैसे काय झाडावर लागलेले नसतात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सनातन हिन्दू धर्म क्या है

Maharana Pratap

chandra shekhar azad